Amit Shah: 'मुंबई नावासाठी आग्रही असलेल्यांमध्ये मीही होतो'; अमित शाह आणि संजय राऊतांमध्ये जुंपली

अमित शाह आणि संजय राऊतांमध्ये जुंपली. बॉम्बे ऐवजी मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह आणि संजय राऊतांमध्ये जुंपली. बॉम्बे ऐवजी मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं असं अमित शाह म्हणाले. 'मुंबई नावासाठी आग्रही असलेल्यांमध्ये मीही होतो' असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. अमित शाहांच्या या वक्तव्याच्या राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे. बॉम्बे ऐवजी मुंबई करण्याचा यावर शाहांचा हात यावर आम्ही हसतोय असं राऊत म्हणाले.

अमित शाहजी काय म्हणाले की बॉम्बेचं मुंबई नाव करण्याचा माझा मोठा हात आहे. आम्ही हसतोय, मुंबई समाचार जो वृत्तपत्र आहे 150 वर्ष जुने म्हणजे मुंबई आहे ही आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी बॉम्बे ऐवजी मुंबई नाव करायचं जे आंदोलन केलं होतं, संघर्ष केलं होतं त्यात खूप जणं होती. सगळ्या पार्टीचे लोकं होते, पण हे बोलतायेत की मीच होतो. म्हणून भीती वाटते उद्या बोलतील लालबागच्या राजाची स्थापना पण आम्ही केली. हे विसरु नका की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यात मराठी माणसांचा पहिला हक्क आहे आणि या मुंबईसाठी 105 लोकांनी बलिदान केलं आहे असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com