व्हिडिओ
Video : गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अमित शहांची मुलाखत
Amit Shah Interview: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले की तत्कालीन गुजरात सरकारवर लावलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते. ज्यांनी मोदीजींवर आरोप केले, त्यांनी भाजप आणि मोदीजींची माफी मागावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरात दंगलीवर गृहमंत्री अमित शहा यांनी आज मौन सोडले. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नरेंद्र मोदींना एसआयटीने दिलेली क्लीन चिट मंजूर केल्यानंतर अमित शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
मुलाखतीमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, न्यायालयीन कामकाजादरम्यान प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांची भूमिका याविषयी सांगितले. शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झाले की तत्कालीन गुजरात सरकारवर लावलेले सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते. ज्यांनी मोदीजींवर आरोप केले, त्यांनी भाजप आणि मोदीजींची माफी मागावी. सुमारे ४० मिनिटांच्या मुलाखतीत ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा न्यायव्यवस्थेवर नेहमीच विश्वास आहे.