व्हिडिओ
Akkalkot Praniti Shinde | अक्कलकोट तालुक्यात रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ
अक्कलकोट तालुक्यात रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ आढळला आहे. तर प्रणिती शिंदे यांनी राज्य सराकरवर गंभीर आरोप केला आहे.
अक्कलकोट तालुक्यात रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ आढळला आहे. तर प्रणिती शिंदे यांनी राज्य सराकरवर गंभीर आरोप केला आहे. दोन गावात रेशनच्या माध्यमातून तांदूळ प्लॅस्टिकचे तांदूळ वाटप करण्याचा प्रकार आढळून आलं आहे. बाडेवाड आणि आदेवाडी या दोन गावामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ वाटप केल्याचं याठिकाणी पाहायला मिळालं आहे. प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सराकरवर गंभीर आरोप केले आहेत.
यापार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, रेशनच्या दुकानात धान्य मिळत नाही आहे. रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडू शकते. या दर्जाचे तांदूळ आदेवाडी अक्कलकोटला देण्यात आला प्लॅस्टिक आहे मी स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर देखील पाहिला. शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत 10 पट वाढ झालेली आहे, ही अतिशय शॉकिंग गोष्ट आहे या सरकारने केली आहे.