ajitpawar : 'महायुतीचं सरकार आलं तर योजना सुरुच राहतील'

महायुतीचं सरकार आलं तर योजना सुरुच राहतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सरकार आल्यावर वीजबिल माफीसुद्धा राहिल, तसेच गरीबाच्या पोटी जन्माला येण हा काही दोष नाही.
Published by :
Team Lokshahi

महायुतीचं सरकार आलं तर योजना सुरुच राहतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सरकार आल्यावर वीजबिल माफीसुद्धा राहिल, तसेच गरीबाच्या पोटी जन्माला येण हा काही दोष नाही. गरीबांच्या मुलांनसुद्धा उच्च शिक्षणाचा अधिकार आहे असं ही अजित पवार म्हणाले आहेत. महिला पुरुषांपेक्षा चांगली जबाबदारी पार पाडतात, कोणत्याही निकालात मुलींचींच बाजू दिसते अस देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

यापार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले की, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचे काम करत आहोत. महायुतीचं सरकार आलं की योजना पुढे चालू राहणार आहे. महायुतीचं सरकार आलं तर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना चालू राहणार आहे.

महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना मोटार आणि तीच वीजबिल माफीची योजना पुढे चालू राहणार आहे. आता आम्हाला दोन पायलेट होते त्यात एक मुलगी होती आणि एक मुलगा होता इतका चांगल्या प्रकारे तिने विमान उतरवलं आम्ही बघत राहिलो. महिलांना एखाद काम दिलं ना तर सर्वात चांगल काम या महिलाच करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com