Atul Benke : राष्ट्रवादीचे अतुल बेनके आणि शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

महत्त्वाची मोठी आणि राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली.
Published by :
Dhanshree Shintre

महत्त्वाची आणि राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली. खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीचे अतुल बेनके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का? या चर्चांना आता उधाण आलं आहे. अतुल बेमकेंच्या पवार भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकतं. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजविण्याचे संकेत दिलेत. बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. या बाबत बेनके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं तर काही जागा आता ही आमच्या पक्षाला सुटणार नाही आपण इथे थांबयाच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जायचं. कारण आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे. समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रावादी आणि उबाठा शिवसेना अशी युती आहे. जिथे उबाठाला जागा जाईल तिथे राहिलेल्या 2 पक्षाचे एखादा स्ट्राँग उमेदवार आहे की यावेळेस काहीही झालं तरी आपल्याला निवडणूकीला उभं राहायचं आहे. ही लोकं इकडे तिकडे जाणार काही लोकं इकडची तिथे जातील, काही तिकडची इकडे जातील ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे आहेत. अजून बरेच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com