व्हिडिओ
सत्तेत सहभागी होण्याआधी अर्थखातं मागितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट
एका अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई : सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच आपल्याला वित्त खाते हवे असल्याची भूमिका अमित शाह यांच्यासमोरं मांडली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याकडेच वित्त खाते असावे, अशी भावना होती. परंतु, माझ्या आग्रहामुळे अर्थ खाते माझ्याकडे आले. पण, देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं प्रोटोकॉल नुसार ते वरिष्ठ असल्याने सुरुवातीला फाईल माझ्याकडे येईल त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मगच मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा निर्णय झाला. तशी माझीच भूमिका होती, असंही अजित पवार यांनी सांगितले.