व्हिडिओ
Onion News : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं
कांदा प्रश्नासंदर्भात तोडगा निघणार आहे.
कांदा प्रश्नासंदर्भात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती सभापती आणि व्यापाऱ्यांमध्ये आज बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. याबाबत सोमवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्यभर आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचं समोर येतंय. सरकारने निर्णय मागे घेण्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांकडून रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून पुणे- नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अहमदनगर आणि राहुरी मध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.