MNS : लोकसभेनंतर राजकीय पक्षांना लागले विधानसभेचे वेध, मनसे विधानसभेत पूर्ण ताकदीनिशी उतरणार

लोकसभेनंतर राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभेनंतर राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. मनसे विधानसभेत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार असल्याचं कळतंय. तर राज ठाकरेंकडून देशपांडेंना वरळी लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे.

ठिक-ठिकाणी बॅनर लावून शक्तिप्रदर्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी संदीप देशपांडे तयारी करत असल्याचे दिसतंय आणि राज ठाकरे महायुतीतून निवडणूक लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com