Gold-Silver Rate : दीड महिन्यानंतर सोने-चांदीच्या दरात घसरण, सोने 2 हजार तर चांदी 3 हजारांनी स्वस्त

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून सोन्याच्या भावात 2 हजार रुपये तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून सोन्याच्या भावात 2 हजार रुपये तर चांदीच्या भावात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून सोन्या चांदीचे भाव हे स्थिर होते मात्र मार्च महिन्यापासून सोन्या चांदीच्या भावा सातत्याने वाढ होऊन सुरू होती. तर गेल्या दीड महिन्यात सोन्या चांदीच्या भावात सुमारे 10 हजार रुपयांची वाढ झाली होती.

मार्च महिन्यानंतर प्रथमच आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहिला मिळत असून जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 71 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे भाव 80 हजार 500 रुपये प्रति किलो इतके आहेत, जीएसटी सह सोन्याचे भाव 73 हजार 700 रुपये, तर चांदीचे भाव 82 हजार 900 रुपये आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com