व्हिडिओ
Thane: मेट्रोच्या खांबावर जाहिराती लावण्यास बंदी
ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रके, फलक, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत.
ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रके, फलक, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. हे फलक चिकटवून शहर विद्रुपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात दर बुधवारी अनधिकृत फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवावी. या मोहिमेत सर्व अनधिकृत फलक काढले जातील याची दक्षता घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.