31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरेंचा दावा

आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

कुडाळ : राज्यात बसलेले घटनाबाह्य खोके सरकार ३१ तारखेला पडणारच, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. विधानसभा-लोकसभा ताब्यात घ्यायचीय, मिशन म्हणून काम करा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घटनाबाह्य पध्दतीने राज्यात बसलेले खोके सरकार येत्या ३१ तारखेला पडणार, असा दावा त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com