Kalyan : कल्याण डोंबिवली परिसरातील 7 ते 8 बारवर कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण डोंबिवली परिसरातील सात ते आठ बारवर तोडक कारवाई केली.
Published by :
Dhanshree Shintre

कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण डोंबिवली परिसरातील सात ते आठ बारवर तोडक कारवाई केली. पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर बार-पब ढाब्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती, मात्र या कारवाई विरोधात बालमालक चालक एकवटले आहेत.

कल्याण ग्रामीण भागातील कोळीवली येथील रुक्मिणी बारवर महापालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईनंतर बारचालक व बार मालकाने कारवाईला विरोध केला. यावेळी बार चालकाने आम्ही सरकारचे विविध कर भरतो. हॉटेल इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह आहे. कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर हॉटेल वर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील. आम्ही डिपार्टमेंटला मॅनेज करतो, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मदत करतो, शासनाचे सर्व टॅक्स नियमित भरतो, मार्च मध्ये परवाना रिन्यू केला आहे, आपलं सरकार म्हणून मतदान केलं, आमच्या आजूबाजूला इतक्या अनधिकृत बिल्डिंग आहेत मग बारला टार्गेट का? आमच्यावर कारवाई का? असा संतप्त सवाल केला. सरकारने कारवाई करण्याआधी आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com