व्हिडिओ
नाशिकरोड कारागृहातून अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरात हलविले
नाशिकरोड कारागृहातून अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरात हलविले असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकरोड कारागृहातून अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात भारतातील एका मोठ्या शहरात हलविले असल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी आहे.
अबू सालेमला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमला नाशिकच्या कारागृहातून हलविले होते.
याच पार्श्वभूमीवर अबू सालेमला हलविण्यासाठी ब्लॅक कॅट कमांडो, जेल पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आरपीएफचे शेकडो जवान तैनात करण्यात आले होते.