व्हिडिओ
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरसाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर
लोकसभा निवडणुकीनंतर 26 जूनला महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर 26 जूनला महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे. या राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पानसे यांच्या नावाची घोषणा केली आहे. याबाबतच्या ट्विटमध्ये मनसेने म्हटले की, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."