Jalgaon : आषाढी एकादशीनिमित्त जळगावमधील कलाकाराकडून रेखाटण्यात आलं खास चित्र

आषाढी एकादशीनिमित्त विटेवर, तुळशीच्या पानावर आणि नारळावर विठुरायाचं चित्र रेखाटण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आषाढी एकादशीनिमित्त विटेवर, तुळशीच्या पानावर आणि नारळावर विठुरायाचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. जळगाव शहरातील सुनील दाभाडे यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केले असून सुनील दाभाडे यांनी आषाढी एकादशी निमित्त विटेवरी विठुरायाची चित्र रेखाटून जळगावकरांना एक अनोखा दर्शन घडविले.

त्याचप्रमाणे नारळावर व तुळशीच्या पानावर देखील विठुरायाचे चित्र यांनी रेखाटले आहे. चित्र रेखाटताना इको फ्रेंडली रंगांचा वापर करून हे चित्र रेखाटले असून या अगोदरही सुनील दाभाडे यांनी विटेवर चित्र काढले होते आणि ती वीट पंढरपूर यातील मंदिरात ठेवण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com