Railway Ticket : रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दीड कोटी रुपये दंड वसूल
रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दीड कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रेल्वेत विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षभरात 173 कोटी रुपयांचा दंड आकारला. कारवाईच्या दंडातून तब्बल दीड कोटी रुपये वसूल करण्यात आलं आहे.
पश्चिम रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी आणि अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी साधारण उपनगरी गाड्या आणि वातानुकूलित उपनगरी गाड्या, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड केली. त्यामुळे संपूर्ण पश्चिम रेल्वेवरून एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत सुमारे 27.66 लाख विनातिकीट प्रवाशांना 173.89 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी विशेष मोहीम राबवून 7 एप्रिल रोजी 200 पेक्षा अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून 70 हजारांपेक्षा अधिक रुपयांची दंडवसुली केली. मध्य रेल्वेतून दररोज सुमारे 40 लाख प्रवाशांचा प्रवास होतो. सोमवार ते शुक्रवार तिकीट तपासनीसांकडून रोज सुमारे 350 ते 400 विनातिकीट प्रवासी पकडले जातात. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी प्रवाशांची गर्दी काहीशी कमी असल्याने 190 ते 210 विनातिकीट प्रवासी सापडतात.