Solapur Crime : शालेय अनुदान नोंदवही गहाळप्रकरणी तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला हादरा बसला आहे. यासंदर्भात सदर बझार पोलीस ठाण्यात उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, जे. एस. शिवशरण आणि जावेद शेख यांच्यासह सुरेश किसन देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ या प्रमुख लिपिकांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख २००५ अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com