Eknath Shinde यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे करार

आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Published by :
Team Lokshahi

आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिंदाल समूहासोबत 41 हजार कोटींचा करार तर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिंदाल समूहासोबत करार करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com