व्हिडिओ
Madha Vidhansabha| माढ्यात अभिजीत पाटील नावाचे 4 उमेदवार; सर्वांचे अर्ज मंजूर | Marathi News
माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा आणि अपक्ष उमेदवारांचे अर्ज मंजूर.
पंढरपूर; माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील नावाच्या चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज छाननीमध्ये चार ही जणांचे अर्ज मंजूर झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्यासह बसपाचे उमेदवार अभिजीत पाटील, अभिजीत टी पाटील अपक्ष आणि अभिजीत ए पाटील अपक्ष असे चारही अभिजीत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या शिवाय रणजितसिंह शिंदे अपक्ष,बबन शिंदे अपक्ष, मिनल साठे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह 31 अर्ज मंजूर झाले आहेत.