'4 पिढ्या आल्या तरी कलम 370 पुनर्स्थापित होणार नाही' अमित शाह

विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले आहेत.
Published by :
shweta walge

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० पुनर्स्थापित करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणायचे आहे. पण 4 पिढ्या आल्या तरी कलम 370 परत मिळणार नाही अस वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला हवे की नको? पण महाविकास आघाडीचे नेते याला विरोध करत आहेत. जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार.

“शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणानंतर सांगितले की, मी नंतर जाईल. पण ते अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. ते का गेले नाहीत? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने विचारावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com