व्हिडिओ
Tata Power: टाटा वीज कंपनीच्या वीजदरात 24 टक्के वाढ
टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांच्या दरांमध्ये एक एप्रिलपासून सरासरी २४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी मंजुरी दिली.
टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांच्या दरांमध्ये एक एप्रिलपासून सरासरी २४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी मंजुरी दिली. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ फारशी नसून १०१ ते ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी हे दर वाढणार आहेत.
टाटा कंपनीने निवासी ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे सादर केल्यावर त्यास जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर कंपनीने सुधारित दर प्रस्ताव सादर केला होता. कंपनीने गेल्या दोन वर्षांत या संवर्गासाठी आयोगाने मंजूर केलेली दरवाढ लागू केली नव्हती. त्यामुळे आता हे दर वाढविले जाणार आहेत.