Water Shortage: मुलुंडमधील 17 इमारती टँकरच्या पाण्यावर; मुंबई महानगरपालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा

मुलुंड पश्चिम परिसरातील 17 इमारतींना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
Published by :
Sakshi Patil

मुलुंड पश्चिम परिसरातील 17 इमारतींना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

मुलुंड पश्चिम परिसरातील योगी हिल कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये एकूण १७ इमारती आहेत. या १७ इमारतींमध्ये १७५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या इमारतींना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, या रहिवाशांवर टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दररोज सुमारे सहा ते सात टँकरमधून सोसायटीला पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र हे पाणी कमी पडत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com