Vande Bharat Train: अतिरिक्त रेक अभावी पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतच्या 124 फेऱ्या रद्द

पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Published by :
Sakshi Patil

पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई – गोव्यादरम्यानच्या जलद प्रवासासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येतात. परंतु, पावसाळ्यात मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन १२४ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. अतिरिक्त रेक अभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पावसाळ्यात या मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने आपत्कालीन घटना होऊ नये यासाठी रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. याचा सर्वाधिक फटका अति जलद रेल्वेगाड्यांना बसतो. यात वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com