गलवान व्हॅलीतील भारत-चीनमधील हिंसक झटापटीचा व्हिडीओ आला समोर…
गलवान व्हॅलीतील भारत-चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. या दोघांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे सैनिक मृत्यू पावल्याचाही घटना घडली होती. चीनने मात्र या घटनांना नाकारल होत. आता मात्र चीनने मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे, त्याचबरोबर एक व्हिडीओही शेअर केला आहे.
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शुक्रवारी गलावानच्या खोऱ्यामध्ये भारत आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक झटापटीचा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत गुडघाभर पाण्यामध्ये भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक आमनेसामने येत धक्काबुक्की करताना दिसत आहे. अनेक ठिकाणचे व्हिडीओ कट एकत्र करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावं आहे. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता.