धारावीतल्या 18 वर्षांवरील सर्वांना लस द्यावी; खा. राहुल शेवाळे यांची मागणी
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी मात करून जगासमोर एक अनोखं उदाहरण ठेवणाऱ्या धारावीत दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. त्यामुळे धारावी येथील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
गेल्या वर्षी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र नागरिकांनी नियम पाळल्यामुळे व राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे धारावीकरांनी कोरोनावर यशस्वी मात केली. या धारावी पॅटर्नची चर्चा जगभर झाली होती.
दुसऱ्या टप्प्यात कोरोना पुन्हा नाक वर काढताना दिसतो आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या प्रकरणावर आता खासदार राहुल शेवाळे यांनी धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल," असं त्यांनी म्हटलं आहे.