उत्तराखंड दुर्घटनेत २६ मृतदेह आढळले; अद्यापही १७१ बेपत्ता

उत्तराखंड दुर्घटनेत २६ मृतदेह आढळले; अद्यापही १७१ बेपत्ता

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमनदी फुटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह आढळले असून अद्यापही १७१ जण बेपत्ता आहेत. उर्जा प्रकल्पाच्या बोगद्यातून ३० कामगारांची सुटका करण्यात आली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

नंदादेवी हिमनदीचा भाग जोशीमठ भागात फुटल्यानं पाणी वेगानं खाली आलं. त्यामुळे अलकनंदा नदीची जलपातळी वाढली होती. अजूनही १७१ जण बेपत्ता असून जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी ते काम करत होते. जवळच्या गावातील काही लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. लोकांचे जीव वाचवण्याला आमचे प्राधान्य आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरआफ आणि एसडीआरएफ यांच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १२ जणांना दोन बोगद्यांतून तर १५ लोकांना ऋषीगंगा येथील प्रकल्पातून वाचवण्यात आलं आहे. अशाप्रकारे २७ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com