तालिबानच्या सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांनी घेतली अजित डोवाल यांची भेट

तालिबानच्या सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांनी घेतली अजित डोवाल यांची भेट

Published by :
Published on

तालिबान्यांनी दोन दशकानंतर अफगाणिस्तावर सत्ता स्थापन केली. नुकतीच तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांची नावे जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी अमेरिकेचे गुप्तहेर विल्यम बर्न्स यांची दिल्लीत भेट घेतली. तालिबानने जाहीर केलेल्या नावांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा पंतप्रधान म्हणून समावेश आहे.

अजित डोवाल आणि सीआयए प्रमुख यांच्यामध्ये काय चर्चा झाली, याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षे संदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. या भेटीत अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली असू शकते. भारताला लक्ष्य करण्यासाठी आणि विशेषत: जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी तालिबान अफगाणिस्तानमधून दहशतवादी गटांना ऑपरेट करू देणार नाही, अशी अपेक्षा यापूर्वी भारताने व्यक्त केली होती.

दरम्यान, डोभाल आज दिल्लीत रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाई पत्रुशेव यांचीही भेट घेत आहेत. चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com