Business
UPI व्यवहारांचं नियोजन करा, ही सेवा या वेळेत बंद राहणार…
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या अनेक UPI अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी UPIचा वापर करत असाल तर ही महत्वाची बातमी आहे. यासर्व अॅप्स नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने NPCI पुढील काही दिवस युपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते अशी महत्त्वाची माहिती युजर्सना दिली आहे.
केंद्र सरकारने डिजिटल इंडियाची घोषणा करून डिजिटल व्यवहारांवर जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. NPCI पुढील काही दिवस युपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते अशी महत्त्वाची माहिती युजर्सना दिली आहे. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान युपीआय पेमेंटच्या सेवेमध्ये समस्या जाणवू शकते. पुढील काही दिवस ही समस्या जाणवू शकेल. अशी माहिती NPCI ने ट्विटरद्वारे दिली आहे.