UP Election 2022 | एमआयएम कडून निवडणुकीच्या संदर्भात घोषणा

UP Election 2022 | एमआयएम कडून निवडणुकीच्या संदर्भात घोषणा

Published by :
Published on

पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुकांचा गुलाल उडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय समीकरणांनी वेग पकडलाय. त्यामुळे उत्तर प्रदेशातील नव्या राजकीय गणितं मांडली जाऊ शकतात. यातच आता एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणुकीत पाय ठेवण्याची घोषणा केली आहे.

"एमआयएम पक्षाने उत्तर प्रदेशातील मोक्याच्या १०० जागांवर उमेदवार देण्याचे ठरवले आहे. यासाठी एमआयएमने ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे". असदुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.

उत्तप्रदेशात मुस्लीम आणि दलित वोटबँकेचे राजकारण परंपरागत सुरू आहे. यामुळेच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे.

बसपा व एमआयएम यांची युती होण्याच्या चर्चांना उधाण येत असतानाच स्वबळाचा नारा देत मायावती यांच्याकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. यामुळे एमआयएम कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com