Vidharbha
‘या’ जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान खात्याचा अंदाज
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट तयार झाले आहे. पुढील दोन दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. कारण मध्य भारतामधील काही भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्व विदर्भातील भागा मध्ये विशेष म्हणजे साकोली,लाखनी,तुमसर आणि लाखांदर ह्या तालुक्यात ज्यास्त अंदाज मांडला जात आहे.
त्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढावल आहे. परिणामी शेतामधील गहू, वाटाणा, कडकण्या आणि चना ह्यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर धानखरेदी केद्रामध्ये खरेदी केलेले तसेच विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर पडल्या असल्यांमुळे तो भिजुन खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा जिल्हातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.