Union Budget 2022 | आरबीआयचं डिजिटल चलन येणार

Union Budget 2022 | आरबीआयचं डिजिटल चलन येणार

Published by :
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी डिजिटल करन्सीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळत असून २०२२ -२०२३ दरम्यान आरबीआयचं डिजिटल चलन येईल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

भारतात लवकरच व्यवहाराची पद्धत बदलणार आहे. तुम्हाला रुपयाचा पर्याय मिळणार आहे. तसे ते रुपया असेल आणि रिझर्व्ह बँकच ते जारी करेल, परंतु ते छापील नोटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. बिटकॉइन, इथर सारख्या खासगी क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून रिझर्व्ह बँकच नव्हे तर जगभरातील केंद्रीय बँका डिजिटल चलनावर काम करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com