Budget 2022
Union Budget 2022 | राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अर्थसंकल्प सादर करताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या बैठकीत भांडवली गुंतवणूकीची मर्यादा वाढवण्याची मागणी राज्यांकडून करण्यात आली. राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.