ukraine russia war युक्रेनने नाटोचा हक्क सोडला, रशियाही नरमला, युद्ध थांबणार?
कीव्ह
रशिया-युक्रेन युद्धाच्या (ukraine russia war)१४ व्या दिवशी विध्वंस थांबण्याची चिन्हे आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी नाटोचे (nato)सदस्यत्व घेणार नाही, असे जाहीर केल्यानंतर रशियानेही एक पाऊल मागे येण्याचे संकेत दिले. यामुळे क्रूड तेलाचे (crude oil)दरही कमी होऊ लागले. या
झेलेन्स्की म्हणाले, दोनेत्सक, लुहान्स्क प्रांतांची स्थिती आणि क्रिमियाला रशियाचे क्षेत्र म्हणून मान्यता देण्याच्या अटींवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. तिकडे रशियन सरकारच्या प्रवक्त्यांनीही चर्चेत प्रगती होत असल्याचे सांगितले. आमच्या अटी मान्य केल्यास युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई थांबवण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगून रशियानेही शुभसंकेत दिले. युक्रेननेही लष्करी कारवाई थांबवावी, संविधानात बदल करून तटस्थ भूमिका घ्यावी, असे रशियाला वाटते. तसेच क्रीमियाला रशियन क्षेत्र आणि दोनेत्स्क-लुहान्स्क यांना स्वतंत्र राष्ट्राच्या रूपात मान्यता द्यावी, अशी रशियाची इच्छा आहे.
झेलेन्स्की यांनी अमेरिकी वाहिनीशी बोलताना सांगितले, आम्ही नाटोचे सदस्यत्व घेणार नाही. नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही. तो रशियाशी टक्कर देण्यास घाबरतो. वस्तुत: अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आपल्या शेजारी येणे रशिया कधीही मान्य करणार नाही. आम्ही दोनेत्स्क, लुहान्स्कच्या स्थितीवर करार करण्यास तयार आहोत.