Pandharpur Wari | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या दाम्पत्याचा सत्कार

Pandharpur Wari | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या दाम्पत्याचा सत्कार

Published by :
Published on

आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात पोहोचून विठ्ठल मंदिरात महापूजा केली. पहाटे २.२० वाजता विठ्ठलाच्या महापुजेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक आरती केल्यानंतर मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला यावेळी वारकरी दाम्पत्य कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे दर्शन रांगेतून निवडलेले नव्हते.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. यंदाही हाच निर्णय कायम ठेवण्यात आलाय. केशव कोलते यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

यंदा देखील यापैकी ४ विणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेकऱ्यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com