India
देशात ट्विटरची कायदेशीर सुरक्षा संपली
भारतात ट्विटरला दिलेले कायदेशीर संरक्षण आता संपले आहे. आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळाले होते. या कायद्याने ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानी किंवा दंडापासून सूट दिली होती. कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरूद्ध पहिला गुन्हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे.
केंद्र सरकारने ट्विटरचे कायदेशीर संरक्षण संपुष्टात काढण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत. सरकारने केलेल्या नियमांचे पालन न केल्याने हे कायदेशीर संरक्षण आपोआपच संपले आहे. कायदेशीर संरक्षण २५ मे रोजी संपले असल्याचे सांगितले जात आहे.