टूलकिट प्रकरण; दिशा रवीच्या ‘त्या’ मागणीवर उद्या सुनावणी
टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आणि सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर असलेल्या दिशा रवीने दिल्ली पोलिसांविरोधातच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाशी सबंधित माहिती लीक केली जाऊ नये, असे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात यावे',अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.
दिशाने याचिकेत म्हटले, 'या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा माहिती लीक केली जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिल्ली पोलिसांना देण्यात यावे', अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅन्डड ऑथोरीटी आणि आणखी काही मिडीया हाऊसेसना नोटीस बजावली आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीविरोधात एफआयआर संदर्भात दिल्ली पोलिसांकडून माध्यमांना दिलेल्या माहितीच्या संदर्भात कोणतीही माहिती लीक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याच्या आडून कट-कारस्थान केल्याच्या आरोपाखाली दिशा रवीला १३ फेब्रुवारीला बंगळुरूहून अटक केली होती. दिशा रवीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर तिला ३ आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.