भार्गव ओ माय गॉड! | TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक

भार्गव ओ माय गॉड! | TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कारप्रकरणी अटक

Published by :
Published on

फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या TikTok स्टारला बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे. विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला ही अटक करण्यात आली आहे . पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे.

फन बकेट भार्गव याने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या होत्या. नंतर त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असं सांगून भार्गवने तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली.

पीडितेच्या आई वडिलांनी विशाखापट्टणममधील पेंढुर्ती पोलिस स्थानकात फन बकेट भार्गव याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बलात्कार पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.फन बकेट भार्गव याला पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com