कानपूरच्या ‘या’ व्यक्तीनं मुंबईहून मागवला सोन्याचा मास्क
कोरोनाची दुसरी लाट जरी ओसर असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका मात्र अजूनही कायम आहे. अशातच कानपूर येथील रहिवासी मनोज सेंगर उर्फ मनोजानंद महाराज, त्यांनी मुंबईहून सोन्याचा मास्क मागवला असल्याचे सांगितले जात आहे. आता या गोल्ड मास्कची सर्वत्र खूप चर्चा होत आहे. शिवशरण मास्कच्या नावाने बनवलेले हे कवच कोरोनापासून त्यांचे रक्षण करेल असा त्यांचा विश्वास आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सोन्याच्या मास्कमध्ये एक सॅनिटायझर सोल्यूशन लावण्यात आले आहे, जे ३६ महिने कार्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. मनोज आनंद महाराज यांनी सांगितले की, सोन्याचे काही मूल्य नाही आणि जेव्हा परमेश्वराचे नाव त्याच्याशी जोडले जाते तेव्हा ते अमूल्य असते. दरम्यान, या सोन्याच्या मास्कच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर त्याची बाजारात साधारण ५ लाख रुपये किंमत असून अशाप्रकारच मास्क हे संपूर्ण भारतात पहिलंच असल्याचे सांगितले जात आहे.