देशातील 73 जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट; ICMR गंभीर इशारा

देशातील 73 जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट; ICMR गंभीर इशारा

Published by :
Published on

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, तिसरी लाट येण्याची चिन्हे आहेत.देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे.

"देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. कोरोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल, असे डॉ. बलराम भार्गव म्हणाले आहेत.

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या खालावत चालली आहे. देशातील कोरोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत.महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये १० टक्क्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हीटीची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com