मुंबईतून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात, ATS ची मोठी कारवाई

मुंबईतून तिसरा संशयित दहशतवादी ताब्यात, ATS ची मोठी कारवाई

Published by :
Published on

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक (six terrorist arrest by Delhi Police) केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर (Terror suspect Zakir) असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता एटीएसच्या पथकाने वांद्रे येथून मोहम्मद इरफान रहमत अली शेख याला बुधवारी रात्री अटक केली.

दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना देशाच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली. यातील जान मोहम्मद शेख याला मुंबईच्या धारावीमधून पकडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन कारवाई करताच महाराष्ट्र एटीएस कामाला लागले. बेकायदेशीर तसेच देशविघातक कृत्याचा कट रचल्याचा संशयाखाली एटीएसने १८ सप्टेंबर रोजी जोगेश्वरी येथून झाकीर ते रिझवान याला १९ सप्टेंबरला मुंब्रा येथून अटक केली. या दोघांवर दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचाही आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com