India
…तर फेसबुक, इन्स्टाग्राम बंद होणार; मेटानं सुरू केली तयारी
फेसबुक, इन्स्टाग्रामसमोरची आव्हानं काही संपता संपेना असं झालं आहे. एका बाजूला फेसबुकच्या डेली युजर्सच्या संख्येत ५ लाखांनी घट झाली. त्यामुळे मेटाचं मूल्य १५ लाख कोटी रुपयांनी कमी झालं. शेअर्सचे भाव २० टक्क्यांनी खाली आले आहे.
वापरकर्त्यांचा तपशील अमेरिकास्थित सर्व्हरमध्ये हलवण्याचा, साठवण्याचा आणि प्रक्रिया करण्याचा पर्याय न मिळाल्यास युरोपमधील फेसबुक, इन्स्टाग्राममधील सेवा बंद करावी लागू शकते, असं मेटानं आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे.
नियमांची नवी चौकट तयार केली गेली नाही तर युरोपमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सेवा देऊ शकणार नाही. यूएस सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशनला एका अहवालाच्या माध्यमातून मेटानं सांगितलं आहे.
यासर्व पार्श्वभूमीवर मेटाच्या अडचणी वाढल्या आहेत.