Thane Accident | ठाण्यात नाल्यामध्ये  पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Thane Accident | ठाण्यात नाल्यामध्ये पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Published by :
Published on

मुंबई-ठाणेकरांना रस्त्यावरचे खड्डे काही नवीन नाहीत. पावसाळ्यात त्यांना या समस्यांना सामोरे जावे लागतेच. त्यातच पावसाळ्या काही कंत्राटदार आपली काम पूर्ण करत नसल्याने या कामांचा फटका सामान्यांना सोसावा लागतो. ठाण्यात नाल्याच्या कामामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील कोरम मॉलजवळ नाल्याचे काम चालु होते.नाल्याच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले.
खड्यामुळे आपघाताचा मोठा धोका बाईकस्वारांना होता. एक बाईकस्वार सोमवारी रात्री तेथुन जात असताना पडलेल्या खड्यातून तोल जाऊन तो नाल्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

विशेष म्हणजे या घटनेत प्रात्रीच्यावेळी नाल्याजवळ कोणतेही बॅरिकेड किंवा कोणतेही सुरक्षारक्षक नेमण्यात आला नव्हता. त्यामुळे येथे सतत अपघात घडत असतात असे नागरीकांनकडुन सांगण्यात येते. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन युवकाचे शव बाहेर काढले. अशा ठिकाणी योग्य ती सुरक्षितता बाळगावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com