पर्यटन स्थळावरील गर्दीमुळे करोनाच्या तिसरी लाट येणार! IMA दिला इशारा

पर्यटन स्थळावरील गर्दीमुळे करोनाच्या तिसरी लाट येणार! IMA दिला इशारा

Published by :
Published on

देशात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी नागरिकांनी पुन्हा एकदा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लोकांच्या या बेजाबदारपणामुळे करोनाची तिसरी लाट जवळ असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळावरील गर्दी तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरेल, असंही सांगितलं आहे. पर्यटन, तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव काही महिने नाही केलं तरी चालेल असंही आयएमएनं स्पष्ट केलं. वेळीच गर्दीवर नियंत्रण आणि करोनाची नियमावली पाळली नाही, तर तिसरी लाट लवकरच येईल अशी भिती आयएमएनं व्यक्त केली आहे.

"तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. मग यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील अनेक भागात सरकार आणि नागरिक नियमावली पाळताना दिसत नाही. करोनाचे नियम तुडवड गर्दी केली जात आहे. पर्यटनक्षेत्र पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. तीर्थयात्रा, धार्मिक उत्सव हे सर्व गरजेचं आहे. मात्र काही महिने थांबल्यास करोनाची तिसरी लाट थोपवता येईल", असं इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com