लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला असतानाच मनेसकडून आली पहिली प्रतिक्रिया
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. लतादीदी यांचे स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. लता मंगेशकर यांचे स्मारक बनवण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लतादिदींचे स्मारक बनावे अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
आता लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला असतानाच मनेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका अशी विनंती केली असून संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. संदीप देशपांडेंनी ट्विटरवर लिहिले की, "छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती".