ICMR | डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होणार

ICMR | डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होणार

Published by :
Published on

देशातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. परंतु लसीच्या तुडवड्यामुळे लसीकरणात अडथळे निर्माण होत आहे. परंतु दुसरीकडे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देशात लसींचा कुठलाही तुटवडा नाही, असे म्हटले. जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत आपल्याकडे दिवसाला १ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुरेसा साठा असेल. डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण होईल, असा दावा आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी केला.

देशातील करोनाने निर्माण झालेली स्थिती आणि लसीकरणाच्या प्रगतीवर केंद्र सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. कोविशिल्ड लस घेण्याच्या कालवाधीत कुठलाही बदल केलेला नाही. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर १२ आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा. हा नियम कोवॅक्सिनसाठीही लागू असेल, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com