‘त्या’ जिलेटीन बनवणाऱ्या कंपनीने राम मंदिरासाठी दिला निधी, कुमार केतकरांचा गौप्यस्फोट

‘त्या’ जिलेटीन बनवणाऱ्या कंपनीने राम मंदिरासाठी दिला निधी, कुमार केतकरांचा गौप्यस्फोट

Published by :
Published on

राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज काँग्रेस खासदार कुमार केतकार यांनी हा मुद्दा उपस्थित करत यामागे नागपूर कनेक्शन असल्याची माहिती दिली. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले जिलेटिन स्फोटक कुठून आले ? कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा खळबळजनक सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कुमार केतकर यांनी राज्यसभेत लोकसभेचे विद्यमान खासदार मोहन डेलकर आणि सचिन वाझे अशा दोन प्रकरणाच्या मुद्द्यावर ते बोलत होते. सचिन वाझे प्रकरणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. त्यानंतर घटनेच्या काही दिवसानंतर त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास एनआयए करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीत सर्वच दिशेने हा तपास सुरु आहे. मात्र या प्रकरणातील नागपूर कनेक्शनचा तपास केला जात नसल्याचे केतकर यांनी म्हटले. ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले आहेत. ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिल्याची खळबळजनक माहिती यावेळी दिली. त्यामुळे या प्रकरणात जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचे असल्याची मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com