6 तास सेवा ठप्प असल्याने फेसबुकचे झाले एवढे मोठे नुकसान

6 तास सेवा ठप्प असल्याने फेसबुकचे झाले एवढे मोठे नुकसान

Published by :
Published on

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेलं फेसबुक आणि व्हाट्सअप्पची सेवा रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे खंडित झाल्याने युजर्सची चिंता वाढवली होती. तब्बल 6 तासांनंतर दोन्ही सेवा पूर्वपदावर आल्या. मात्र 6 तास सेवा ठप्प झाल्याने फेसबुकचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. तसेच लोकांची माफी देखील मागितली आहे.

फेसबुकला व्यत्ययामुळे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती एका दिवसात ७ बिलियन्स डॉलर म्हणजेच ५२,१९० कोटी रुपयांनी घटली आहे. तर, फेसबुकला आलेल्या या डाऊन क्रॅशमुळे कंपनीच्या रेव्यन्यूमध्ये ८० मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळपास ५८६ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि व्हॉट्सअप बंद पडल्याने इंटरनेट ग्लोबल ऑब्जर्वेटरीच्या अंदाजानुसार जगभरातील अर्थव्यवस्थेला प्रति तासाला १६० मिलियन्स डॉलर म्हणजेच ११९२.९ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

त्यातच सोमवारी हा प्रकार घडल्यावर संबंधित व्हिसल ब्लोअरने त्याची ओळख सार्वजनिक केली आहे. सोमवारी जागतिक स्तरावर या सेवा बंद पडल्यामुळे भारतासह अनेक देशातील युजर्सच्या झालेल्या गैरसोयीबद्दल फेसबुकने माफी मागून खेद व्यक्त केला पण सेवा ठप्प होण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. भारतातील सरकारी आकडेवारीनुसार फेसबुकचे ४१ कोटी, व्हॉटस अपचे ५३ कोटी तर इन्स्टाचे २० कोटी युजर्स आहेत. यापूर्वी मार्च आणि जुलै मधेही फेसबुक सेवा कोलमडली होती.

सर्व्हर डाऊन नावाने ट्विटरवर हे ट्रेंडिग सुरू होते. एकाने वायरींच्या जंजाळात अडकलेल्या एका व्यक्तीचा फोटो टाकून फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग नेमकी काय तांत्रिक समस्या आहे हे शोधत असल्याचा विनोद केला. एकाने ट्विट केले त्यात, रेल्वे ट्रॅकवरून जाणारा एक ट्रक दाखविला आणि त्याला फेसबुकची उपमा दिली. दुसऱ्या टोकाकडून येणारी एक रेल्वे त्या ट्रकला उडवून पुढे जाते त्या रेल्वेची तुलना ट्विटरशी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com