मणिपूरमध्ये ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यानचा भ्याड हल्ला

मणिपूरमध्ये ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यानचा भ्याड हल्ला

Published by :
Published on

इंफाळ – मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबावर अतिरेक्यांनी दबा धरून भ्याड हल्ला केला. सैन्याच्या तुकडीवर स्फोटक हल्ला झाला असून या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले आहेत. सैन्याच्या तुकडीवर पाळत ठेवून दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला आहे.

ही घटना चूडाचांदपुर जिल्ह्यातील सिनघाट सब डिव्हिजनमध्ये घडली आहे येथे तैनात असलेल्या 46 आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कमांडिंग अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह क्यूआरटीमध्ये तैनात असलेल्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लष्कराकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे. हा हल्ला भ्याड असून त्याचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com