नंबर न सेव्ह करता पाठवू शकता मेसेज; करा 'या' स्टेप फॉलो
सर्वाधिक वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग App अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (whatsapp). फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाइल्स, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल अशा अनेक गोष्टींसाठी हा अॅप वापरता येतो. तसेच, व्हॉट्सअॅप वेळोवेळी नवीन फीचर्स वापरकर्त्यांसाठी घेऊन येत असते. अगदी ऑफिसच काम असलं तरी ते व्हॉट्सअॅपवरून केलं जाते. यामुळे सर्वाधिक व्हॉट्सअॅप वापरले जाते. व्हॉट्सअॅप आपल्यासाठी अनेक फीचर्स घेऊन येत असतं.
अनेकदा आपल्याकडे कुणाचा नंबर सेव करायचा राहिला असेल आणि महत्त्वाची काही माहिती पाठवायची राहिली असेल. तर आपल्याला पहिला नंबर सेव्ह करावा लागत असे. पण आता व्हॉट्सअॅपवर सेव्ह न केलेल्या नंबरवरती म्हणजे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवरही आपण मेसेज पाठवू शकता. यासाठी मेटाचे अलीकडेच लाँच केलेले मेसेज युवरसेल्फ फीचर्सद्वारे आपण काही सेकंदात मेसेज, फोटो, डॉक्युमेंट किंवा अगदी तुमचं लोकेशन पाठवू शकतो.
या स्टेप वापरून सेव्ह नसलेल्या नंबरवर व्हॉट्स अॅपवरून करा मेसेज
व्हॉट्स अॅपमध्ये ‘मेसेज युअरसेल्फ’ चॅटवर क्लिक करा.
तसेच तुम्हाला ज्या नंबरवरती मेसेज पाठवायचे आहे तो नंबर टाईप करून तो नंबर स्वत:ला पाठवा.
आता तो पाठवलेला नंबर तुम्हाला निळ्या रांगामध्ये दिसेल.
आता तुम्ही त्या नंबरवर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘चॅट विथ फोन नंबर’, ‘कॉल ऑन व्हॉट्सअॅप’, ‘अॅड टू कॉन्टॅक्ट्स’ हे पर्याय तुम्हाला दिसतील.
या पर्यायामधील ‘चॅट विथ फोन नंबर’या पर्यायावर क्लिक करून चॅट विंडो उघडेल.
तुम्ही उघडलेल्या या विंडोतून तुम्ही सेव्ह ने केलेल्या नंबरवर मेसेज पाठवू शकता.