whatsapps-new-feature
whatsapps-new-featureTeam Lokshahi

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, एकाचवेळी 32 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारं सोशल मिडीया अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापर्कत्यांसाठी नेहमीच नवनवीन अपडेट घेवून येताना दिसतो.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात सर्वाधिक वापरण्यात येणारं सोशल मिडीया अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापर्कत्यांसाठी नेहमीच नवनवीन अपडेट घेवून येताना दिसतो. आता व्हॉट्सअपकडून एक नवं फिचर लाँच करण्यात आलं आहे.

whatsapps-new-feature
अजय देवगणच्या भोलामध्ये दिसणार अभिनेत्री अमला पॉल

या फीचरद्वारे आता ग्रुपमध्ये 1024 सदस्यांना सहभागी करता येणार आहे. तसेच व्हिडिओ कॉलवर 32 जण सहभागी होणार आहेत.यासंदर्भात मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली आहे. फक्त एवढंंच नाहीतर 2 जीबीपर्यंत व्हिडिओ, फोटो आणि डॉक्युमेंट शेअर करता येणार आहे.

त्याचबरोबर ग्रुपमधील सदस्याला यामध्ये आपलं मत देखील नोंदवता येणार असून इनचॅट पोलदेखील घेता येणार आहे. दरम्यान, हे फिचर कसं दिसेल? फीचरच्या कार्यक्षमतेबाबत माहिती अद्याप कंपनीकडून उघड करण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com